राज्यात पुढील ४ ते ५ दिवस अतिवृष्टीचा पाऊस, सतर्क राहण्याचे आवाहन.


मुंबई : पुढील ४-५ दिवस पश्चिम कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता संबंधित जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवावी. आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

कालही ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडेदेखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel